
प्रतिनिधी :उत्कर्ष बोर्ले
जोगेश्वरी पूर्व अरविंद गंडभीर हायस्कूल मधील सेवा निवृत्त शिक्षिका सुहासिनी वरटी वय वर्ष ८० यांना नुकताच जॉय संस्थेच्या वतीने आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.जवळपास तीस वर्षांवर अधिक काळ त्यांनी विद्यार्थ्यांना शिकविले आणि आज त्यांच्या हाताखाली शिकलेल्या अनेक मुलांनी स्वतःचे उद्योगधंदे सुरू केलेत तर अनेकजण देशात आणि परदेशात मोठमोठ्या ह्युद्यांवर कार्यरत आहेत.एक सुसंकृत आणि विद्यार्थी प्रिय शिक्षिका म्हणून आजही लोक त्यांना ओळखतात.प्रमुख पाहुणे डॉ महादेव वळंजू, कामगार नेते आणि अरविंद शाळेचे माजी विद्यार्थी अविनाश दौंड, उच्च न्यायालयाचे सुसंस्कृत वकील जगदीश जायले, सत्येंद्र सामंत, ॲड रुशीला रिबेलो, राजेंद्र घरत यानी त्यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान केला.यावेळी अस्मिता संस्थेचे दादा पटवर्धन, शिक्षक नेते जनार्दन जंगले, ज्येष्ठ पत्रकार वृत्तपत्र लेखक विश्वनाथ पंडित या तिघांना जॉय संस्थेचा जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला.कार्यक्रमाचे आयोजन जॉय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश हिरवे यांनी केलं होत.आयुष्यात सेवानिवृत्ती काळात मिळालेला पुरस्कार खूप ऊर्जादायक असल्याचे वरटी यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर सांगितले.
Congrats