
प्रतिनिधी : वैशाली महाडिक
मुंबई : मालाड येथील सेंट अँन्स इंटरनॅशनल शाळेने जोगेश्वरीच्या जे ई एस शाळेचा मुंबई स्पोर्ट्स स्कूल असोसिएशन आयोजित उदघाटनीय फुटबॉल मॅचमध्ये ३-० ने पराभव करीत विजय संपादन केला.वांद्रे येथील विंग्ज ग्राऊंडवर १६ वर्षाखालील मुलांच्या फुलबॉल मॅचेस सुरू असून यात एकुण ६० संघानी भाग घेतला आहे.पहिल्याच मॅचमध्ये सेंट अँन्स च्या मुलांनी जबरदस्त खेळ केल्याने मुख्याध्यापिका व्हेनेसा डीक्रुझ, प्रशासक अर्लिन रॉड्रिग्ज, शैक्षणिक समन्वयक नादिया डीयाझ, फुटबॉल प्रशिक्षक शादाब आणि झेन शेख यांनी सर्व खेळाडूंचे कौतुक केल्याचे क्रीडा प्रमुख अक्षय जाधव यांनी सांगितले असून सर्व मान्यवरांनी त्यांना पुढील मॅचेस साठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Good congratulations
Congrats