
सैफ अली खान चा रुग्णालयातील फोटो.
प्रतिनिधी :मिलन शहा
मुंबई,माझा जीव वाचवणाऱ्या ड्रायव्हरशी व्हिडिओ कॉलवर बोललो..दिनांक 16 जानेवारीच्या रात्री बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर, उत्तराखंडमधील ऑटो चालक भजन सिंग राणा यांनी त्यांचे प्राण वाचवले. सहा वेळा चाकूने वार करण्यात आले आणि पाठीच्या कण्याजवळ गंभीर जखमी झालेल्या सैफला त्याचा मुलगा तैमूर आणि घरातील नोकर हरीसह लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. जेव्हा घरकाम करणाऱ्या नोकराने मदत मागितली तेव्हा राणाने कोणताही आळस न करता जखमी सैफला रुग्णालयात नेले. सतत रक्तस्त्राव होत असतानाही सैफ शांत राहिला आणि त्याने राणाला रुग्णालयात पोहोचण्यासाठी किती अंतर आहे ते विचारले. राणाने सैफकडून भाडेही घेतले नव्हते.