सोलफूल सॅटरडे तर्फे श्रुती सरगम प्रस्तुती?

Share


प्रतिनिधी:सुरेश बोरले

मुंबई,सोलफूल सॅटरडे तर्फे संचातरफे विलेपार्ले प्रबोधनकार ठाकरे संकुलात!श्रुती तांबे ह्यांचा बहारदार गाण्यांचा कार्यक्रम दि.21 सप्टेंबर रोजी सायंकाळी सादर करण्यात आला.स्मृतीचे पिताश्री विजयानंद तांबे हे सुध्दा स्वतः चांगले गायक असून,त्यानी आपली कन्या हीलाही चांगली तालीम देऊन तयार केलेले आहे.तर तिची साथ द्वंद्व गीतांना देणारे सर्व श्री.सतीश पुरोहित, सतीश नायर,सचिन उघाडे व निखिल भक्ता आदि पट्टीच्या गायकांनी श्रुतीला साथ देऊन कार्यक्रमात रंगत आणली.तर सदर प्रसंगी तीचे गुरुवर्य श्री.दीपक चव्हाण ह्यांचाही सन्मान करण्यात आला.भरगच्च भरलेल्या सभागृहात! प्रेक्षकांनी ह्या कार्यक्रमात प्रत्येक गित्तांना टाळ्यांची साथ देत स्वागत केले.तसेच सफल महाराष्ट्र समाचार (एसएमएस) चे ही कौतुक केले.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *