सौरभ नेत्रवलकरची नेत्रदीपक कामगिरी!

Share

File photo
प्रतिनिधी :सुरेश बोरले

टी_20क्रिकेट विश्वचशक 2024 स्पर्धेची सध्या जगात धूम सुरू आहे.तर उतरोतर ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आलेली आहे.ह्या स्पर्धेची चुणूक वाढत आहे.पण ह्या स्पर्धेत,एका नवख्या संघाने!आपली चमक दाखवली आहे.तो संघ म्हणजे अमेरीकेचा क्रिकेट संघ.इतर राष्ट्रातील येथील स्थायिक खेळाडूंचा हा नवखा चमू!ह्या संघाने आपल्या पहिल्याच जटक्यात पाकिस्तान संघाला नमवल.त्यामुळेच हा संघ बाहेर फेकला गेला.परंतु अमेरिकन संघातील,भारतीय वंशाचा गोलंदाज सौरभ नेत्रवलकर ह्याने आपल्या खेळात,जी चमक दाखवली आहे ती उल्लेखनीय आहे.भारता तर्फे ह्या पठ्ठ्याने 19वर्षा खालील,विश्वचषक स्पर्धेत प्रतिनिधित्व केले होते.त्या सामन्यांतही त्याने चमकदार कामगिरीही केली होती!परंतु पाक संघाने उपांत्य फेरीत भारताला अगदी नगण्य धाव संख्येने पराभूत केले.त्यामुळे ह्या उदयोन्मुख खेळाडूची कामगिरी जाकली गेली.शिवाय भारतीय संघातही स्थानासाठी रस्सीखेच असल्याने, नेत्रवलकरने संगणक अभियंता म्हणून अमेरिकेची वाट धरली व तेथेच नोकरी करायला सुरुवात केली.गाठीला क्रिकेटचा अनुभव होताच!ह्याचा उपयोग त्याने स्थानिक क्रिकेट संघात केला व शेवटी अमेरिकन संघात स्थान मिळवत,डावखुरा गोलंदाज म्हणून! टी -20 स्पर्धेत त्याने चांगली गोलंदाजी करीत, पाक संघाला नमवण्यात महत्वाचा वाटा उचलून,त्याने आपला जुना वचपा काढला.तर भारतीय संघा सोबत स्पर्धेत खेळताना त्याने विश्व लोकप्रिय खेळाडू विराट कोहली व कप्तान रोहित शर्माला बाद करून सामन्यात धमाल उडवली होती.परंतु हा सामान भारताने जिंकला होता.असा हा गुणी खेळाडूला भारताकडून खेळायला संधी मिळाली नाही,पण अमेरिके सारख्या प्रगत राष्ट्रीय संघात आपल्या मेहनतीने स्थान मिळवून त्याने चमकदार कामगिरी केली!हे विशेष आहे.आज त्याचे वय पाहता त्याने हा पल्ला गाठला आहे, हे सुध्दा कमी नाही.तो भारतीय वंशाचा असल्याने व महाराष्ट्राचा असल्याने,आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे. सौरवला येणाऱ्या भविष्य काळासाठी हार्दिक शुभेच्या!


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *