
File photo
लेखक :सुरेश बोरले
मुंबई,भारतीय चित्रपट सृष्टीत मूकपट पासून ते बोलपट पर्यंत,अनेक दिग्गज कलाकारांनी आपले योगदान,ह्या चंदेरी दूनेयेसाठी दिलेले आहे.त्या मध्ये मुकपटाही कामे करताना, आपला दरारा दाखावला!तर बोलपटच्या जमान्यात, आपल्या अंगचे कलागुण पटलावर सादर केले.त्यामुळे त्यांच्या अनुभवाची नांदी! ही बोलपट सिनेमात ,सुवर्ण युगाची नांदी ठरली.शुभ्र धवल रंगानं पासून ते रंगीत सिनेमातही त्यांनी आपली चमक दाखवली.अशा मातब्बर कलाकारांची आठवण होणे व नवीन पिढीला त्यांच्या कर्तृत्वाची जाण करू देणे,हे आपल प्रथम कर्तव्य आहे.आज आपण अशा एक, अष्टपैलू कलाकारा बद्दल जाणून घेऊ,त्यामध्ये त्यांची असणारी जबरदस्त देहबोली,तथा सिहाच्यागर्जने सारखा पहाडी आवाज,ह्या दोघांची सांगड त्यांनी घातली व एक ख्यातनाम कलाकारा प्रमाणे, ते ह्या चंदेरी दुनियेत वावरले.तसेच त्यांच्या घराण्याने, भारतीय चित्रपट दूनियेसाठी,भरपूर काही दिलेले आहे.आज चवथी पिढीही ह्या सिने जगताची निस्सीम सेवा करीत आहे.ते आहेत!स्वर्गीय,पृथ्वी राज कपूर.
त्यांचा जन्म 3 नोव्हेंबर,1903 साली लोयलपुर,फाळणी पूर्वी पाकिस्तानात झाला.आता हा विभाग फैसलाबाद येथे आहे.त्यांचे शिक्षण,पेशावर येथील एडवर्ड महाविद्यालयात झाल.हा विभाग पाक्तूनखाबा खैबर खिंडीत आहे.मग ते वकील झाले.त्याच ठिकाणी त्यांनी,नाट्य व रंग मंच्याचा,अनुभव घेतला.त्यावेळेला मुंबई नगरी ही एखाद्या हॉलिवूड प्रमाणे होती.त्यामुळे प्रत्येकाला ह्या मोह नगरीचे आकर्षण प्रत्येक कलाकाराला होत.येथील चित्र नगरी त्यांना खुणावत होती.1928 साली पेशावरहून मुंबईला येण्यासाठी,त्यांनी आपल्या मावशिकडून कर्ज घेतले.मुंबईत आल्यावर,मग त्यांनी अर्धेसर इराणी,ह्यांच्या इंपिरियल फिल्म कंपनीत काम सुरू केले.तेथून त्यांनी छोटी मोठी कामे सुरू केली.ह्या संथे तर्फे 1929 साली आलेल्या “गर्ल”ह्या सिनेमात त्यांना पाहिले काम मिळाले.एकंदरीत 9 मूकपट त्यांनी केले.त्या मध्ये त्यांनी इतिहास रचला तो 1931 साली आलेल्या पहिला बोलपट,”आलामआरा” मधे.त्यात त्यांनी सहायक अभिनयाची भूमिका केली.ही एक अभिमानाची गोष्ट आहे.मग आलेला, 1937 विद्यापती हा सुद्धा लोकांना आवडला.परंतु त्यांच्या कामाचा गौरव1941 साली,”सिकंदर”ह्या चित्रपटात झाला.तो सिनेमा स्व.सोहराब मोदी यांनी निर्मित केला होता.नंतर त्यांनी ग्रँनड अँडरसन कंपनीत कामे करण्यास सुरुवात केली.ही ब्रिटिश कंपनी,नाटक कंपनी होती.मग त्यांनी नाट्य मंचासाठी,आपल्याला वाहून घेतले.त्यामुळे त्यांनी नाटक व सिनेमात अनेक भूमिका रंगवल्या.अशाने त्यांची नाट्यरूची वाढली.त्यासाठी त्यांनी सगळ्या कलाकारांना घेऊन एक संच तयार केला.पृथ्वी थिएटर ग्रुप!त्यामध्ये कालिदास,शकुंतला अशी 1942 साली दर्जेदार नाटके दिली.ह्या थिएटरंने अंतरश्ट्रिय स्थरावरही,आपली कला पेश केली.त्यामध्ये स्वतंत्र चळवळीची नाटकेही होती.त्यामुळे क्रांतीकारकांची एक फळीच तयार झाली. स्वातंत्र्य चळवळीत त्यांचाही खारीचा वाटा आहे.ह्या 16 वर्षाच्या काळात,त्यांनी 2662 प्रयोग सादर केले.त्याकाळी पृथ्वी राज कपूर ह्यांचा एकच संच असा होता की,तो संपूर्ण नाटकात काम करायचा.1946 साली पठाण ह्या नाटकाचे,मुंबईत 600वर प्रयोग झाले.त्यामध्ये हिंदू मुस्लिम मित्रांची कथा होती.परंतु 1950 नंतर हा संच अनंत आर्थिक अडचणीत सापडला.80 लोकांचा सर्व खर्च झेपेनासाव झाला. त्यामधील अनेक तांत्रिक माणसे व कलाकार चित्रपटाकडे वळले.त्यामध्ये त्यांचं मुलगा स्व.राजकपूरही होता.1955 साली आवारा मध्ये दोघांनी कामे केली.त्यानंतर त्यांची स्व.शम्मी कपूर वशशी कपूरही ह्या क्षेत्रात आले.परंतु 1960 साली युसुफ खान अर्थात दिलीप कुमार यांच्यासोबत आलेल्या,मोगल-ए -आझम या गाजलेल्या चित्रपटात ,बादशहा अकबराची भूमिका यांनी अजरामर केली.नंतरही त्यांनी अनेक सिनेमात उत्कृष्ठ कामे काली.इतरही भाषेतील चित्रपटात केलेली आहेत.
स्व.पृथ्वी राज कपूर ह्यांना मिळालेली परितोषके
1954›संगीत नाटक अकादमी.
1959›पुंनहा अकादमी.
1969›भारत सरकार तरफे पद्मविभूषण.
1972›दादा साहेब फाळके पुरस्कार.
जुहू येथील पृथ्वी थिएटर,त्यांचाच नावाने आहे.त्यांच्या तिन्ही मुलांनी,भारतीय सिने जगतात नावे कमावून,सेवा केली. 29मे,1972 साली,जुहू कॉटेजमध्ये,पृथ्वीराज सारख्या,दिग्गज कलाकार हा जग आणि भारतीय सिनेमा श्रुष्टी ला सोडून कायम चा निघून गेला. मात्र त्यांनी केलेली देश सेवा व चित्रपट उद्योगाची सेवा! ह्या दोन्ही सेवेसाठी,त्यांचा स्मरण आज ही केले जाते.
Popular and great actor