
प्रतिनिधी :सुरेश बोरले
बॉलीवूडच्या शंभर वर्षाहून अधिक काळात,फिल्मी दुनियेत अनेक प्रकारच्या भूमिका आणि अनेक प्रकारच्या आपल्या अंगच्या कलागुणांनी भरलेल्या आपल्या पठडीतून अनेक कलाकारांनी आपली कला पेश केली. या हिंदुस्थानी फिल्मी जगताला एक उच्च पातळीवर नेऊन ठेवलेले आहे.त्यातील काही हयात आहेत,तर काही स्वर्गवासी झालेले आहेत. आज हे कलाकार आपल्यामध्ये नाहीत, पण कलेच्या माध्यमातून आजही ते आपल्यात जिवंत आहेत.एक पेशेवर अभिनेता आपली कला पेश करताना, ती कला खुमासदार व मनाला प्रेरित करणाऱ्या असतात, असाच एक हास्य नट, आपल्या मृदू मुलायम शब्द फेकिने, हलके फुलके व मनाला गुदगुल्या करणारे,हळुवारपणे मनाला चाटून जाणारे विनोद त्याने सादर केले. कधी ज्योतिशाच्य वेशात कधी साधूच्या वेशात कधी फसवेगिरी करणारा महाठक अशा अनेक वेशात त्यांनी आपली कला सादर केली. हा कलाकार मुख्य अभिनेत्या बरोबर, वेगवेगळ्या प्रकारचे विनोदी चाळे करणारा सहाय्यक हास्य. अभिनेता, म्हणून वावरला. आपल्या डोळ्यांच्या विचित्र हालचाली करणारा हा कलाकार म्हणजेच स्वर्गीय,सुंदर! नावाप्रमाणे सुंदर चेहरा परंतु विनोदी आभासाचा. त्यांना पडद्या वर पाहिलं की लोकांना हसू आवरायचं नाही. असे हे महान अभिनेता सुंदर. त्यांचा जन्म ब्रिटिश पाकिस्तानात 14 मार्च १९०८ रोजी लाहोर येथे झाला. १९३८ते १९८० दशका पर्यंत त्यांनी फिल्मी दुनियेची सेवा केली. एकंदरीत 436 पेक्षा अधिक चित्रपटात त्यांनी कामे केली. त्यामध्ये हिंदी पंजाबी व इतर भाषांचे चित्रपट आहेत. तर एकंदरीत साठ वर्षे त्यांनी फिल्मी जगताची प्रदीर्घ सेवा केली. चौधरी करनेल सिंग,ही त्यांची दूरचित्रवाणी मालिका बरीच गाजली. या दूरचित्रवाणीच्या मालिकेत त्यांनी आपली चमक दाखवली. त्याच खरं नाव तर सुंदर सिंग पण बऱ्याच चित्रपटात त्यांचा सुंदर लाल नावाने ओळखले जायचे. परंतु बॉलिवूडच्या दुनियेत टोपण नाव धारण करण्याची प्रथा आहे. त्याप्रमाणे त्यांना सुंदर हे पक्क झाल. ज्याप्रमाणे अनेक नट मुंबई फिल्मी जगतामध्ये आपलं नशीब आजमवण्यासाठी आले, त्याप्रमाणे स्वर्गीय. सुंदर ही चंदेरी दुनियाच्या लालसेने आले होते. सुरुवातीला चित्रपटात गायक म्हणून वावरले. परंतु या फिल्मी झगमगटाच्या दुनियेत कोण कशासाठी आला व शेवटी काय बनला? अशी अनेक कलाकारांची व्यथा आहे,तीच व्यथा सुंदर यांची झाली. एक सहाय्यक अभिनेता काम करता करता,ते हास्य कलाकार कधी झाले ते त्यांनाही कळलं नाही. मुख्य नटाच्या
च्या सोबत त्यांच्या प्रेम प्रकरणांमध्ये कुणी तरी मध्यस्थी असावा,अशा भूमिका स्वर्गीय सुंदर साहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे निभावल्या. त्यांच्या जमान्यातही अनेक पट्टीचे हास्य अभिनेते पडद्यावर होते. पण त्यांची बरोबरी करणे ही एक तारेवरची कसरत होती, ती त्यांनी पार पडली व त्यांच्यासोबत त्यांनी मोठ्या हिमतीने कामे केली.ही एक मोठी गोष्ट आहे.सोज्वळ स्वभावाचा माणूस म्हणून ते चंदेरी दुनियेत वावरले.कुणाशी वेडे वाकडे नाही,अगदी सहज स्वभावाचा माणूस म्हणून त्यांची ख्याती होती मिळालेल्या कामाला आपलं सर्वस्व अर्पण करून,ती भूमिका प्रेक्षकांच्या मनात उतरवायची हा त्यांचा हेका होता. म्हणून हलकाफुलक्या शब्दांचा विनोदी अभिनेता म्हणून ते ओळखले जायचे. त्यांच्या जीवनात कधी चढ-उतार हा आलाच नाही कारण त्यांना कोणतेही पारितोषिक कधी मिळाले नाही किंवा त्यांचे कौतु कधी नाही झाले.पण त्यांची आपली रोजी रोटी एका बाजूने चालू होती. परंतु आपल्या जबरदस्त हास्य केलेने, त्यांनी कौतुकाची थाप प्रेक्षकांकडून मिळवली. आपल्या चांगल्या संबंधांमुळे व कलेच्या जोरावर त्यांना अनेक चित्रपटाचा कामे मिळत गेली, असा हा एक चांगला गुणी कलाकार ५ मार्च १९९२.
रोजी स्वर्गवासी झाला.त्यांनी केलेल्या साठ वर्षाच्या निस्सीम सेवेला आमचा मनापासून सलाम.