
प्रतिनिधी : वैशाली महाडिक
मुंबई: राष्ट्र सेवा दल, मालाड च्या वतीने स्वातंत्र्य दिनी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे रक्तदान शिबीर शुक्रवार दिनांक १५ ऑगस्ट रोजी सकाळी ८ते २. ३० वाजेपर्यंत, ठाणेकर हाऊस,प्रकाश आनंद भवन,समोर जानव्ही हॉस्पिटल, तुरेल पाखाडी रोड, मालाड पश्चिम. येथे आयोजित करण्यात आले आहे. राष्ट्र सेवा दल, मालाड मागील ४३ वर्षा पासून सातत्याने अविरत पणे स्वातंत्र्य दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करीत आहे. यंदाचे हे ४३ वे रक्तदान शिबीर आहे. यंदा शंभर बाटल्या रक्त संकलनाचे लक्ष्य आहे. या साठी आयोजक सीताराम बंडगर,मंगेश गुरव आणि नरेंद्र मेस्त्री यांनी रक्तदात्यांना जास्तीतजास्त संख्येने रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे.अशी माहिती सिद्राम बंडगर यांनी दिली आहे.
Raktdan shreshth daan
Great