
प्रतिनिधी :सुरेश बोरले
मुंबई,गोरेगाव पूर्वेकडील द्रुतगती मार्गा नजीक असणारा मोहन गोखले चौक् हा अतीशय खड्डेमय आहे.काही कारणास्तव, रस्त्या वर पाडलेले खड्डे, व्यवस्थित ना बुजवल्यामुळे कीवा व्यवस्थित भर न केल्यामुळे, येणारा जाणाऱ्या वाहनांना अडचण होत आहे. खड्ड्यापाशी आल्यावर वाहन हे थांबलं जातं, त्यामुळे मागच्या वाहनांची रांग लगोलग लागते.आणि वर्दळ जाम होते. पश्चिमेला असणारा द्रुतगती मार्ग, उत्तरेला असणारा पद्मावती मार्ग आणि दक्षिणेला असणारा दूध सागर मार्ग,या चारही बाजूने सतत वाहने येत असतात,त्यामुळे येथे सकाळच्या वेळेला अतिशय कठीण परिस्थिती निर्माण होते. समोरच पोलीस बीट चौकी आहे, परंतु लक्ष नसतं आणि संपूर्ण येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांचा खोळंबा होत असतो. पालिका प्रशासनाने हे काम लवकरत लवकर पूर्ण करावं, असे लोकांना वाटते.तसेच पोलिसांनी सुद्धा या ठिकाणी वाहनांची वर्दळ व्यवस्थित हाताळावी,म्हणजे लोकांना त्रास होणार नाही.
