
प्रतिनिधी :मिलन शहा
अंतराष्ट्रीय :हमास नेता याह्या सिनवार यांचा मृत्यू! इस्रायलने हमासच्या नवीन प्रमुखाच्या मृत्यूची पुष्टी केली!हमासचा प्रमुख याह्या सिनवार हा गाझामध्ये एका दिवसापूर्वी मारल्या गेलेल्या तीन दहशतवाद्यांपैकी एक होता.इस्माईल हनियानच्या मृत्यूनंतर सिनवारला हमास या दहशतवादी संघटनेचा प्रमुख बनवण्यात आला होता.दि नांक 7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्रायलमध्ये झालेल्या हत्याकांडाचा सिनवारवर आरोप होता.इस्रायलनेही अमेरिकन अधिकाऱ्यांना सिनवार यांच्या मृत्यूची माहिती दिली आहे.