प्रतिनिधी :मिलन शहा
दिल्ली :काँग्रेस आणि आप या दोन्ही पक्षांमध्ये युतीबाबत सुरू असलेली चर्चेला विराम! आम आदमी पार्टीने हरियाणातील 20 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.आम आदमी पार्टीने आज सकाळीच काँग्रेसला अल्टिमेटम दिला होता – “काँग्रेसने सायंकाळपर्यंत निर्णय न घेतल्यास आम्ही यादी जाहीर करू. युती बाबत काहीच होत नसल्याचे पाहून आम आदमी पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.आम आदमी पार्टीने आपल्या पहिल्या यादीत ज्या 20 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत, त्यापैकी काँग्रेसने 11 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत.