एसएमएस प्रतिनिधी–मिलन शहा
मीरा रोड :मीरा-भाईंदरमध्ये स्व. हरिश्चंद्र आमगावकर जिम्नॅस्टिक सेंटर या अत्याधुनिक प्रकल्पाचे भूमिपूजन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते संपन्न झाले. ५००० चौ.मी. क्षेत्रफळावर उभारले जाणारे हे सेंटर शहरातील युवा पिढीला क्रीडा क्षेत्रात नवी दिशा देणार आहे.
सेंटरमध्ये जिम्नॅस्टिक हॉल, वॉर्मअप एरिया, फिजिओथेरपी रूम, कोच व टीम रूम्स, कॉन्फरन्स हॉल, योगा रूम, म्युझिक रूम, व्हीआयपी रूम, आधुनिक स्टोरेज आणि उच्च सुरक्षा प्रणाली अशा सुविधा उपलब्ध असतील.
मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, “मीरा-भाईंदरच्या युवकांसाठी हे सेंटर म्हणजे स्वप्नांना पंख देणारे व्यासपीठ आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्यासाठी येथील प्रत्येक युवकाला सक्षम वातावरण मिळेल.”
जिमनॅस्टिक सेंटर तर उभारले.मात्र,त्याच्या भविष्यातील डागडुजी कडे नित्यनेमाने लक्ष द्यायला हवे!…
Good
Good