मुंबई- येळवण बौद्धजन विकास मंडळाचे माजी सरचिटणीस हिरोजी देवजी येळवणकर यांचे वयाच्या 82 व्या वर्षी कल्याण येथील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले . त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी एक मुलगा व मुली,नातवंडे असा परिवार आहे. हिरोजी येळवणकर यांनी मंडळाच्या पदावर असताना मंडळासाठी भरीव कामगिरी केली होती. राजापूर तालुक्यातील येळवण हे त्यांचे मूळ गाव आहे. त्यांच्या जाण्याने एक निस्वार्थी कार्यकर्ता हरपल्याची मत पत्रकार चंद्रशेखर जाधव यांनी व्यक्त केले आहे.