
प्रतिनिधी : उत्कर्ष बोर्ले
मुंबई : बी के मोहिते संस्मरणीय हॉकी स्पर्धेच्या शेवटच्या साखळी सामन्यात युनायटेड वांद्रे संघाने बॉम्बे रिपब्लिकन संघाचा ४:१ ने पराभव करत सेमी फायनल मध्ये दिमाखात प्रवेश केला.या सामन्यात फॉरवर्ड खेळणारा अक्षय जाधव, कॉर्नर तुषार ठंडेकर आणि किथ मॅथ्यूज यांनी शानदार गोल केले.आता ही स्पर्धा महत्त्वाच्या टप्यात आली असून चर्चगेट येथील महिंद्रा हॉकी स्टेडियम मध्ये कोण अंतिम विजयी होणार आणि बी के मोहिते ट्रॉफी वर आपले नाव कोरणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.कोणत्याही परिस्थितीत फायनल आम्हीच जिंकू असा विश्वास युनायटेड वांद्रे संघाने व्यक्त केला आहे.एकूण १३ संघानी या स्पर्धेत भाग घेतलेला आहे.
Great going congrats