एसएमएस -प्रतिनिधी -वैशाली महाडिक

कुणबी विकास मंडळ, गावठाण वाडी , तळेकांटे, ता.संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी.
होळी विशेष :कोकणात होळी उत्सवाची सुरुवात होताच गावागावांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबई आणि पुणे येथील चाकरमानी गावाकडे परतण्याच्या तयारीत असून रेल्वे व एस.टी.ची आरक्षणेही फुल झाली आहेत. गावांनीही सणाच्या स्वागतासाठी गजबजायला सुरुवात केली आहे.
काही गावांमध्ये पारंपरिक ‘खेळे’ घरोघरी जाऊन सादर होऊ लागले आहेत. ‘शंखासुर’ आणि ‘गोमू’ यांच्या वेशभूषेत कलाकार देवासमोर नमन करून भक्तिभावाने पूजन करत सकाळी आपल्या साथीदारांसह गावात फेरफटका मारतात. अनेक वर्षांची ही परंपरा जपण्याचे कार्य स्थानिक मंडळी निष्ठेने करत आहेत.
कोकणातील होळी ही केवळ सण नसून लोकसंस्कृती, परंपरा आणि एकजुटीचे प्रतीक मानली जाते.

कुणबी विकास मंडळ, गावठाण वाडी , तळेकांटे, ता.संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी.
Khup chan
होळी उत्सवाची खुप खुप शुभेच्छा
होलीरेहोली