
प्रतिनिधी : उत्कर्ष बोर्ले
मुंबई : सेंट टेरेसा हायस्कूल वांद्रे मुंबई येथील शिक्षिका असम्पशन रॉड्रिग्ज या २६ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाल्या.त्या या शाळेत १९९४ रोजी दाखल झाल्या होत्या.एक कर्तव्यदक्ष आणि विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून सर्वजण त्यांना ओळखत होते.कार्यक्रमात शाळेतील शिक्षिकानी छान गीत गाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.तर शाळेचे मुख्याध्यापक फादर शिनोय यांनी त्यांना शुभेच्छा देत त्यांच्याबद्दल गौरोदगार काढले.फादर यावेळी खूपच भावूक झाले होते.यावेळी शाळेचे विधार्थी, पालक, शिक्षक, यांनी देखील त्यांच्या आठवणी सांगत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शाळेचे मॅनेजर फादर हेन्री, ॲडमिनिस्ट्रेटिव फादर अक्षित, कौन्सेलर फादर जोस, शिक्षिका असम्पशन यांचे नातेवाईक उपस्थित होतें.मनोगत व्यक्त करताना असम्पशन यांनी आपल्या आठवणी सांगून सर्व गोष्टींना उजाळा दिला तसेच शाळेतून निवृत्त होताना मन खूपच भरून आल्याचे सांगून शाळेची नेहमीच आठवण येत राहील असे नमूद केले.अनेक शिक्षक, विधार्थी यांनी शिक्षिका असम्पशन यांच्या आठवणी सांगितल्या.जॉय चे संस्थापक गणेश हिरवे यांनी देखील त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविले.सूत्रसंचालन शिक्षिका डायना मेनेझेस यांनी केले.

Happy retirement
हैप्पी 2nd inning