६० विधवा महिलांना रेशन किटचे वितरण.

Share

एसएमएस -प्रतिनिधी -सोमा बाबू डे.

मुंबई : लाईट ऑफ होप फॉउंडेशन आणि श्री हिरालाल मगनलाल दोशी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्याने गोरेगाव पश्चिम येथील भगतसिंग नगर क्र. १ परिसरातील गरजू व वंचित ६० विधवा महिलांना एक महिन्यासाठी आवश्यक असलेले सुखे रेशन किट वितरित केले.
प्रत्येक रेशन किट महिलांच्या मासिक अन्नाच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आले होते. त्यामध्ये तांदूळ, गव्हाचे पीठ, साखर,चहा,मसूर डाळ,तूर डाळ, चणा , मीठ , सनफ्लॉवर तेल, सह इतर आवश्यक वस्तूंचा समावेश होता.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश स्वतःचा उदरनिर्वाह करणे कठीण असलेल्या विधवा महिलांना अन्नसुरक्षा आणि आधार देणे हा होता. या मदतीमुळे अनेक महिलांना मोठा दिलासा मिळाला.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उदार दाते, सहकार्य करणाऱ्या संस्था तसेच समर्पित स्वयंसेवक यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या सहकार्यामुळे अनेक गरजूंच्या जीवनात आशा, दिलासा आणि आनंदाचा किरण निर्माण झाला आहे.
सेवाभावी कार्यातून समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे आयोजकांनी सांगितले.


Share

3 thoughts on “६० विधवा महिलांना रेशन किटचे वितरण.

  1. अशा सहकार्य करणाऱ्या संस्था म्हणजे गरिबांचे देव आहेत त्याना खरच गरिबी काय आहे हे माहित आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *