
FilePhoto
प्रतिनिधी :मिलन शहा
मुंबई: गोरेगावमध्ये २७ कोटी रुपये खर्चून बांधलेला उड्डाणपूल अवघ्या ६ वर्षांत पाडण्याची तयारी सुरू…मुंबई महानगर पालिकेच्या या निर्णयाने लोक संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.कारण काय तर मुंबई महानगर पालिकेचा असा युक्तिवाद आहे की हा उड्डाणपूल मुंबई कोस्टल रोड आणि गोरेगाव-मुलुंड लिंक रोड (जीएमएलआर) च्या फेज-२ च्या प्रस्तावित कनेक्शनच्या मार्गात येत आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की जेव्हा हा उड्डाणपूल बांधला गेला तेव्हा कोस्टल रोड प्लॅन अस्तित्वात नव्हता,
बृहन्मुंबई महानगरपालिकेने गोरेगाव पश्चिमेतील वीर सावरकर उड्डाणपूल पाडून बांधण्याची योजना आखली आहे, परंतु स्थानिक रहिवाशांना हे नियोजन आवडत नाही. हा उड्डाणपूल २०१८ मध्ये २७ कोटी रुपये खर्चून पूर्ण झाला आणि तेव्हापासून परिसरातील वाहतूक समस्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.
आता मुंबई महानगर पालिका म्हणते की हा उड्डाणपूल मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात येत आहे, म्हणून तो पाडणे आवश्यक आहे. आता जनतेच्या कष्टाने कमावलेले ₹२७ कोटी कराच्या माध्यमातून सरकारला दिलेले पैसे स्वाहा होण्याची चिन्ह दिसत आहे. तसेच जर खरंच ha उड्डाण पूल पडला तर वाहतुकीचे काय होणार असा मोठा प्रश्न hi निर्माण होणार!!
BMC &Government need to rethink and chk alternative optios