
file photo
प्रतिनिधी :मिलन शहा
पॅरिस ऑलिम्पिक :भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटने रौप्य पदक बहाल करण्याच्या अपीलवर निर्णय घेण्यासाठी क्रीडा लवादाने आणखी 24 तासांची मुदतवाढ दिली आहे. आता याप्रकरणी 11 ऑगस्टला निर्णय अपेक्षित आहे.
सीएएस ने विनेश फोगटच्या अपात्रतेच्या प्रकरणात निर्णयाची मुदत 11 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे.
या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी रात्रीच पूर्ण झाली आणि क्रीडा लवादाच्या तदर्थ विभागाने भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटच्या अपीलवर शनिवारी भारतीय वेळेनुसार रात्री 9.30 वाजता निर्णय देणार असल्याचे निवेदन जारी केले.
मात्र निर्धारित कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यात पुन्हा एकदा बदल करण्यात आला.
आता या प्रकरणाचा निर्णय रविवारी (11 ऑगस्ट) सकाळी 9.30 वाजता येईल.
Hopeso