
आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई हून हज यात्रेसाठी रवाना
पालकमंत्री अस्लम शेख यांनी विमानतळावर उपस्थित राहुन यात्रेकरुंना दिल्या शुभेच्छा..
मुंबई, हज यात्रेकरुंचा पहिला समुह आज छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाहून मध्यरात्री 2.05 वाजता एस.व्ही. 5739 विमानातून रवाना झाला. मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी यावेळी विमानतळावर व्यक्तीश: उपस्थित राहत यात्रेकरुंच्या सुरक्षीत प्रवासासाठी प्रार्थना करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
माध्यमांशी संवाद साधताना मंत्री शेख म्हणाले की, कोरोना महामारीच्या वैश्वीक संकटामुळे गेली दोन वर्ष सर्वच धर्मांच्या विविध उपक्रमांवरती निर्बंध लावण्यात आले होते. कोरोनाच्या संकटाचे मळभ आता हळू-हळू दूर होत आहे. आज दोन वर्षांनंतर हज यात्रेसाठी पहिला समुह रवाना होत आहे, ही अतिशय आनंदाची आणि उत्साहाची बाब आहे.
