प्रतिनिधी :मिलन शहा
मुंबई रेल्वे स्थानकावर रेल्वेच्या डब्यात एका महिलेवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शनिवारी आणि रविवारी रात्री वांद्रे रेल्वे टर्मिनस येथे एका 55 वर्षीय महिलेवर एका तरुणाने ट्रेनच्या रिकाम्या डब्यात बलात्कार केल्याचा आरोप केला आहे.. या घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी आरोपी अटक केली आहे. रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ ) आणि सरकारी रेल्वे पोलिसांनी (जिआरपी ) रविवारी सकाळी आरोपीला रेल्वे परिसरातून अटक केली. प्राथमिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, आरोपी पीडितेला रिकाम्या ट्रेनमध्ये कसे घेऊन गेला, जिथे तिच्यावर बलात्कार करण्यात आला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ते म्हणाले की, एका वाटसरूने पीडितेच्या जावयाला, जो झोपलेला होता, याची माहिती दिली, परंतु तोपर्यंत आरोपी पळून गेला होता. आरोपी रेल्वे स्थानकात मजूर म्हणून काम करतो: या घटनेनंतर महिलेने जीआरपीकडे तक्रार केली. तक्रारीनंतर पोलिसांनी टर्मिनसचे सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा आरोपी पुन्हा वांद्रे टर्मिनसमध्ये दिसला . यानंतर, त्याला पहाटे पाच वाजता त्याच रिकाम्या ट्रेनमधून ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, आरोपी रेल्वे स्टेशनवरच कामगार आहे आणि तो फूटपाथवर राहतो. त्याने आपले नाव राहिल शेख असल्याचे सांगितले, परंतु ही त्याची खरी ओळख आहे का हे शोधण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत. पीडित मुंबई दर्शनाला आली होती
: या निष्काळजीपणाच्या प्रकरणात, आरपीएफने त्यांच्या एका कर्मचाऱ्याला निलंबित केले आहे कारण त्याला ही घटना घडलेल्या विभागाचे निरीक्षण करण्याचे काम सोपवण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला तिच्या जावयासह हरिद्वारहून मुंबईतला आली होती. मुंबईत तिच्या एका ओळखीच्या व्यक्तीने त्यांना फेरफटका मारायला नेले मात्र रात्री झोपण्यासाठी घरी व्यवस्था करू शकले नसल्याने ती महिला आणि तिचा जावई वांद्रे टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म 6/7 वर झोपले असताना हे कृत्य घडल्याचे सांगितले.