
प्रतिनिधी :मिलन शहा
मुंबई :डोंबिवली येथील 7 वर्षांच्या संग्राश निकम याचा विक्रम …अटल सेतूपासून गेटवे ऑफ इंडियापर्यंत 17 किलोमीटरच सागरी अंतर केवळ 3 तास 11 मिनिटात पोहून पार केलं. कल्याण डोंबिवली शहरातला संग्रांश हा पहिला लहान मुलगा आहे ज्याने हा विक्रम केला आहे.
डोंबिवलीतील : केवळ 7 वर्षांचा संग्राश निलेश निकम, डोंबिवली पश्चिमेतील रामाई श्री हरी सोसायटी मध्ये राहतो आणि ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता दुसरीमध्ये शिक्षण घेत आहे. मुलांना मोबाईलमध्ये गुंतण्याऐवजी काहीतरी विधायक करावे, या उद्देशाने त्याचे पालक त्याला यश जिमखानामध्ये पोहण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी घेऊन गेले.संग्राशने अवघ्या 8ते 9 दिवसांत पोहायला शिकून घेतले. प्रशिक्षणाच्या काळात तो इतर मुलांचा सराव स्पर्धा पाहत असे आणि म्हणत असे, “मलाही त्यांच्या सारखंच करायचं आहे.” ही जिद्द पाहून त्याच्या पालकांनी त्याला अॅडव्हान्स कोचिंगसाठी दाखल केले. एक महिन्याच्या सरावानंतर समुद्रात पोहण्याचा सराव सुरू झाला.समुद्रात पोहायला अनेक मुलं व पालक घाबरतात, पण संग्राशने धाडस दाखवत, अटल सेतूपासून गेटवे ऑफ इंडियापर्यंतचा सागरी जलतरण प्रवास करण्याचा निर्णय घेतला आणि 18 एप्रिल रोजी पहाटे 3 वाजून 41 मिनिटांनी अरबी समुद्रात पहिली उडी मारली आणि न थांबता अटल सेतु (उरण) ते गेट वे ऑफ इंडिया पर्यंत सागरी अंतर अवघ्या 3 तास 11 मिनिटात पोहून पार केले … हे अंतर 17 किलोमीटर चे आहे …. संग्रांश हा कल्याण डोंबिवली शहरातील पहिलाच एवढ्या लहान वयात असलेला मुलगा आहे ज्याने कमी वेळात 17 किलोमीटर चे अंतर पार करून विक्रम नोंदविला आहे ….. संग्रांश च्या ऐतिहासिक सागरी प्रवासाचे सगळीकडून कौतुक केले जात आहे.या साहसी प्रयत्नासाठी यश जिमखानाचे प्रशिक्षक विलास माने, रवी नवले आणि अरुण त्याला मार्गदर्शन करत होते…. पालकांनी ह्या सगळ्यांचे आभार मानले आहेतसंग्रांश ह्या धाडसी कामगिरीला पालकांनी जे प्रोत्साहन दिलं ते खरच कौतुकास्पद आहे….. संग्रांश च्या पुढील वाटचालीस आमच्या शुभेच्छा