म.वा.देसाई उद्यानाचे झाले तळे….

Share

प्रतिनिधी : वैशाली महाडिक

मुंबई : मालाड पश्चिमेतील मालवणी क्रमांक १ येथील  पालिकेच्या म. वा. देसाई उद्यानाला आले तळ्याचे स्वरूप. मालवणी गेट क्रमांक १येथील या उद्यानात पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने येथे पावसाचे पाणी घुडग्या एवळे साचले त्यामुळे परिसरातील नागरिकांना येथे जॉगिंग, वॉकिंग तसेच व्यायाम करीता वापर करता येत नाही. मागील अनेक वर्षांपासून स्थानिकांनी या समसयेबाबत पालिकेला पत्र देऊन उद्यानात पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था निर्माण करण्याचची मागणी केली आहे.तसेच या उद्यानाचा उपयोग दर  गणेशोत्सव साठी  कृत्रिम तलाव बनवण्यासाठी केला जातो यंदा ही पालिकेने दोन कृत्रिम तलाव बांधले होते. त्यावेळी ही पावसाने येथे चिखलमय झाले होते तरी ही पालिका पी उत्तर विभागातील अधिकार्यांच्या ही कसे हे लक्ष्यात येत नाही की उद्यान रस्त्याच्या समतोल नाही उलट जवळ पास तीन फूट खाली आल्याने पावसाचे संपूर्ण पाणी रस्त्यावरून या उद्यानाच्या मुख्य प्रवेश द्वारातून आत शिरून साचते. तसेच उद्यानात या पाण्याचा निचरा व्हावा या साठी काहीच व्यवस्था नसल्याने या ठिकाणी पाणी साचून उद्यानाला तळ्याचे स्वरूप आले आहे.

चौकट:मालवणी क्रमांक १ते ६ दरम्यान हा केवळ एकमेव उद्यान असल्याने  येथील नागरिकांना जॉगिंग, वॉकिंग, व्यायाम तसेच फेरफटका मारण्याचे हे मुख्य ठिकाण तसेच मुलांना खेळण्यासाठी सुद्धा एकमेव अधिकृत जगावल्याने त्यांच्या साठी हे महत्वाचे ठिकाण आहे.तसेच मालवणी च्या मुख्य द्वारावर असल्याने मालवणीची शान म्हटले जाते.


Share

3 thoughts on “म.वा.देसाई उद्यानाचे झाले तळे….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *