
प्रतिनिधी : उत्कर्ष बोर्ले
मुंबई : पोलिस जाणीव सेवा संघ, महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष रविसर फडणीस यांच्या आणि संजय शेकोकार यांच्या मार्गदर्शनाखाली खार दांडा येथे गणेश विसर्जन सोहळ्याच्या वेळी संघाच्या माध्यमातून पोलीस सोबत वाहतूकीचे नियमन करणे व कायदा सुव्यवस्था राखणे व या कार्यात पोलीस यंत्रणेस प्रभावी सहकार्य करण्यात आला.या उल्लेखनीय कार्याची दखल घेत, पोलिस जाणीव सेवा संघाच्या खार दांडा मुंबई टीमला वांद्रे विभाग सहायक पोलिस आयुक्त अधिकराव पोळ, खार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजिव धुमाळ, तसेच पोलिस निरीक्षक वैभव काटकर, दिपाली मरळे आणि प्रकाश मोरे यांच्या हस्ते प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या उपक्रमाबद्दल पोलिस जाणीव सेवा संघाचे कौतुक करण्यात आले असून, सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून केलेल्या सामाजिक कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
Congrats
Congrats