प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांच्या वाढदिवसानिमित्त “नमो युवा रन”…

Share

प्रतिनिधी : उत्कर्ष बोर्ले

  मुंबई : भाजयु मोर्चा, मुंबईच्या वतीने  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त “नमो युवा रन” चे आयोजन रविवार, दि.२१ सप्टेंबर रोजी मुंबईतील प्रतिष्ठित कोस्टल रोड प्रोमेनेड, वरळी येथे पार पडणार असून, हा कोस्टल रोड प्रोमेनेडवरील पहिला भव्य सोहळा आहे. सेवा पंधरवड्याच्या उपक्रमाअंतर्गत हा कार्यक्रम “व्यसनमुक्त भारत” अभियानाला समर्पित असणार आहे. या अंतर्गत.५ किमीची ही धाव प्रधानमंत्री “व्यसनमुक्त भारत” या संकल्पनेला पुढे नेत “व्यसनमुक्त मुंबई”चा संदेश देण्यासाठी समर्पित आहे. यामध्ये ७००० हून अधिक मुंबईकर सहभागी होणार आहेत.

या उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ₹१० लाखांचे योगदानही देण्यात येणार आहे. प्रसंगी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस , कॅबिनेट मंत्री  आशीष शेलार, मंगलप्रभात लोढा, भाजयुमो राष्ट्रीय अध्यक्ष खासदार  तेजस्वी सूर्या , मुंबई अध्यक्ष अमित साटम, पद्मश्री अभिनेता अशोक सराफ ,मिलिंद सोमन  तसेच समाजातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


Share

One thought on “प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांच्या वाढदिवसानिमित्त “नमो युवा रन”…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *