पुन्हा गांधी रिंगण नाट्याचा रौप्यमहोत्सवी प्रयोग संपन्न.

Share

प्रतिनिधी : वैशाली महाडिक

पुणे : साने गुरूजी स्मारक येथे सुरु असलेल्या समाजवादी एकजुटता राष्ट्रीय संमेलनात मी लिहिलेल्या आणि दामोदर कल्पना नागेश यांनी दिग्दर्शित केलेल्या पुन्हा गांधी या रिंगण नाट्याचा रौप्यमहोत्सवी प्रयोग संपन्न झाला.

देशभरातील समाजवादी साथींसमोर गांधी मार्गावर चालणार्या महान विभूतींचा परिचय करुन देताना आनंद झाला. याच सभागृहात गांधींचं करायचं काय मुक्तनाट्याने standing ovation मिळवलेच्या आठवणीही ताजा झाल्या.

सहभागी कलाकारात मुस्तफा शिकलगार याचा हा पहिलाच प्रयोग होता. दामोदर आजारी असतानाही हे रिंगण नाट्य पुन्हा उभे करण्याचे बेताने धडपडीला, ही गोष्ट फारच आनंददायी व अभिमानास्पद आहे.

Bravo Gandhi team…..कारण कोणतेही मानधन, प्रवास खर्च न घेता सेवादलाच्या कलापथकाने कसे असावे याचा वस्तुपाठ या मुलांनी घातला. आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे दिवस जेव्हा ही मुले चळवळीला चिकटवतात, तेव्हा अजूनही काम करायला जागा आहे अशी आशा दिसत राहते.


Share

3 thoughts on “पुन्हा गांधी रिंगण नाट्याचा रौप्यमहोत्सवी प्रयोग संपन्न.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *