
प्रतिनिधी : उत्कर्ष बोर्ले
मुंबई : मालाड मालवणी गेट क्रमांक ८ येथील म्हाडा प्राधिकरणाच्या खुल्या प्लॉट वर अनधिकृत पार्किंग जोमाने सुरु आहे. साधारण एक दिड वर्षा आधी म्हाडा प्राधिकरणाच्या मालकीच्या जागेवर असलेले अतिक्रमण हटवून त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक बसवून येथे पुन्हा अतिक्रमण होऊ नये तसेच जागा सुरक्षित राहावी आणि कोणते हो गैर प्रकार रोखण्यासाठी सुरक्षा रक्षकांना नेमण्यात आले होते. सुरुवातीला काही प्लॉट मोकळे करून पत्र्याच्या संरक्षण भिंती उभारल्या होत्या. परंतु कालंतराने या ठिकाणाचा वापर अनधिकृत पार्किंग साठी सुरु झाले. यात सुरक्षा रक्षक तसेच म्हाडा अधिकाऱ्यांचे आणि पार्किंग माफियाचे संगणमताने अनधिकृत पार्किंग सुरु झाली असल्याचे स्थानिकांनी आरोप केले आहेत.
:म्हाडा च्या वतीने कोणाला ही पार्किंग साठी परवानगी दिली नाही. तसेच सुरक्षा रक्षक नेमले आहेत. या बाबत माहिती घेऊन नियमानुसार कारवाई करणार -रोहित शिंदे -म्हाडा अधिकारी.
या बाबत साईट सुपर व्हायझर(सुरक्षा रक्षक )-विजय वारंग. यांना विचारल्यावर ते म्हणाले आम्ही येथे देखभाल करीत आहोत. मात्र थोडी फार पार्किंग होते. या बाबत कोणती परवानगी आहे का त्या बाबत नकार दिला.
ये बड़ा स्कैम लगता हैं कई लोग इस मे शामिल होंगे
Sadsituation
Mhada अधिकारी फक्त बसून पगार खातात काय?
Security