प्रतिनिधी :वैशाली महाडिक
मुंबई: गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीत ५ मोटर सायकल व १ तीन चाकी अश्या ६ बेवारस वाहने मिळून आलेली आहेत. सदर नमूद वाहने गोरेगाव पोलीस ठाणे आवारात ठेवण्यात आलेली आहेत. तरी गोरेगाव पोलीस ठाणे आवारातील खालील नमूद बेवारस वाहनांच्या मालकी हक्काबाबत आजपासून १५ दिवसांच्या आत वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरेगाव पोलीस ठाणे, गोरेगाव पश्चिम येथे संबंधीत वाहनांच्या कागदपत्रांसह प्रत्यक्ष येवून संपर्क साधावा. जर नमूद वाहनांचा मालकी हक्क सांगण्याकरिता १५ दिवसांच्या आत गोरेगाव पोलीस ठाणे येथे उपस्थित राहीले नाहीत, तर सदर वाहनांचा कायदेशीर प्रक्रिया करून लिलाव करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.
Good
Gd