प्रतिनिधी : सुरेश बोर्ले
क्रिकेट : काही लोक ही जगात आवडत्या क्षेत्रात असीम कामगिरी करतात किंवा करून जातात.त्या कामगिरीचा आठवणींचा ओघ त्यांच्या पश्चातही कायम रहातो. क्रिकेटच्या क्षेत्रात संपूर्ण मदार ही पंचांच्या हातावर व बोटांवरती असते.ह्या पंचगिरीत प्राविण्य मिळवलेले व तांत्रिक उपकरणे नसतानाही, अचूक निर्णय देणारे! पंच
डीकी बर्ड ह्यांचे आज इंग्लंड येथे ९२ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी १९७३ साली पंचगिरी सुरू केली होती.अचूक निर्णय व शांत स्वभाव असल्याने,प्रत्येक खेळाडू व क्रिकेट रसिक त्यांचे चाहते होते. निवृत्ती नंतरही त्यांना तोच मान होता.आपल्या कारकीर्दीत त्यांनी ६६ कसोटी सामने आणि ७६ एकदिवस सामन्यात त्यांनी अचूक कामगिरी केली.एकंदरीय
२३ वर्षे त्यांनी आंतरराष्ट्रीय पुरुष व महिला क्रिकेटसाठी आपले योगदान दिले.त्यांना तमाम क्रिकेट रसिकांतर्फे श्रद्धांजली!
So sad rest in peace
Rip