प्रतिनिधी : उत्कर्ष बोर्ले
मुंबई : सामाजिक न्याय, शांतता आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्या नेतृत्वाखाली 29 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत नागपूर येथील दीक्षा भूमी पासून वर्धा येथील सेवाग्राम पर्यंत संविधान सत्याग्रह पदयात्रा काढणार आहेत.
आज देशातील सामाजिक सौहार्द, लोकशाही व्यवस्था, मानवी मूल्ये, संकटात आहेत. एका विचारसरणीने समाजात फूट पाडण्याचा आणि सांप्रदायिकतेचे विष पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे.वाढती महागाई, बेरोजगारी, आरोग्य, शिक्षण , महिला सुरक्षा,हे प्रश्न आ वासून उभे आहेत. सामाजिक कार्यकर्त्यांना त्रास देण्याकरिता निर्माण केलेला जनसुरक्षा कायदा, अशांत असलेले मणिपूर, पारदर्शक आणि प्रामाणिक हेतूने निवडणूक प्रक्रिया राबवावी. मतांच्या गडबडीबाबत लोकांच्या मनातील शंका निवडणूक आयोगाने दूर कराव्यात. अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील अनेक गावात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. शेतीचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदतीचा हात देऊन ओला दुष्काळ जाहीर करावा,
वाढत्या धर्मांधतेच्या विरोधात तसेच संविधानाच्या चौकटीत राहून वैज्ञानिक आणि विवेकी दृष्टीचा आनंदी समाज निर्माण करण्याकरिता संविधान आणि सत्याग्रहाला प्रमाण मानून आपली एकजूट आणि अखंडता टिकविण्यासाठी 29 सप्टेंबर पासून 2 ऑक्टोबर पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दीक्षाभूमीला नमन करून महात्मा गांधी यांच्या सेवाग्राम येथील आश्रमा पर्यंत महात्मा गांधी आणि डॉ.आंबेडकर यांच्या मार्गावर तुषार गांधी चालत जाणार आहेत.त्यांच्या सोबत देशाचे नेते शरद पवार, महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ, शिवसेनेच्या सुषमा अंधारे , अरविंद सावंत, काँग्रेसचे आरिफ नसीम खान,राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण, शहीद भगतसिंह यांचे भाचे प्रा.जगमोहन सिंग, हिमांशु कुमार, प्रफुल्ला सामंत्र,निरंजन टकले, उल्का महाजन,अविनाश पाटील, डॉ.सुनीलम,अशा विविध राजकीय पक्षाचे, सामाजिक संस्था संघटनेचे नेते, कार्यकर्ते पदयात्रेत सामील होणार आहेत. ‘ हम भारत के लोग ‘ ने यासाठी पुढाकार घेतला आहे.
Good
चला आपण सारे सामील होवुया