
प्रतिनिधी : वैशाली महाडिक
मुंबई : प्रा. डॉ. एन. डी. पाटील विद्यालय, सह्याद्रीनगर व ज्ञानवर्धिनी विद्यालय, चारकोप यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मवीर भाऊराव पाटील यांचा १३८ वा जयंती सोहळा चारकोप गुरुकृपा हॉल येथे उत्साहात व जल्लोषात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. मदनराव चव्हाण होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजनाने झाली. प्रास्ताविकात मुख्याध्यापिका सौ. शिल्पा जरे यांनी दोन्ही विद्यालयांच्या इतिहासाचा आढावा घेतला, तर श्री. उमाकांत जगताप यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
अहवाल वाचनातून शाळांची प्रगती, उपक्रम व यश अधोरेखित करण्यात आले. ज्ञानवर्धिनी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. दादा गावीत यांनी अडचणींतूनही केलेली शाळेची वाटचाल व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे आश्वासन अधोरेखित केले.
रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव (माध्यमिक) श्री. बी. एन. पवार यांनी कर्मवीरांच्या शैक्षणिक कार्यावर प्रकाश टाकला. प्रमुख वक्ते प्रा. डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी समाजातील मूल्यांची घसरण होत असल्याचे नमूद करून पालक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना संस्कारित करण्याची जबाबदारी पार पाडावी, असे प्रतिपादन केले.
अध्यक्षीय भाषणात श्री. मदनराव चव्हाण यांनी शाळांच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करून गुणवत्तेत अधिक वाढ होईल, असे सांगितले. आभारप्रदर्शन सौ. उर्मिला निंबाळकर यांनी केले.
या कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव (उच्च शिक्षण) प्रा. डॉ. शिवलिंग मेनकुदळे, सहसचिव (माध्यमिक) श्री. बी. एन. पवार, ऑडिटर डॉ. राजेंद्र मोरे, रायगड विभागाचे सहाय्यक विभागीय अधिकारी श्री. विलासराव जगताप, तसेच ज्ञानवर्धिनी विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य महादेव भिंगार्डे व श्री. घनश्याम देटके ,माजी विद्यार्थी ,पालक, शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.*
सूत्रसंचालन श्री. प्रबळकर एन. एस. व सौ. सुविधा पाटील यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला व शेवटी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.

Good