
प्रतिनिधी : वैशाली महाडिक
मुंबई : पहलगाम आतंकवादी हल्ल्यात मरण पावलेले स्थानिक नागरिक आदिल शहा यांच्या कुटुंबियांना कुर्बानीतील रकमेतून मदत देण्यात आली आहे.
२२ एप्रिल २०२५ ला दहशतवाद्यांनी पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेले पर्यटकांवर अचानक गोळीबार करून २६ जणांना जीवे मारले होते त्याच वेळी तिथे आलेल्या एक काश्मिरी घोडेवाला तरुण सय्यद आदिल शहा याने निर्भयतेने दहशतवाद्यांच्या हातातून बंदूक हिसकावून पर्यटकांचा जीव वाचवण्याच्या प्रयत्न केला होता. मात्र दहशतवाद्या बरोबर झालेल्या झटापटीत सय्यद आदिल ला गोळी लागल्याने तो मृत्यूमुखी पडला. मुंबईतील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या निसार अली सय्यद या तरुणाने सफल विकास वेलफेअर सोसायटी च्या माध्यमातून तसेच मालाड मालवणीतील काही मुस्लिम तरुणांनी बकरी ईद च्या कुर्बानीतून काही रक्कम सय्यद आदिल शहा याच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी आवाहन करत ₹११५००/- जमा केले व ती रक्कम सय्यद आदिल शहा यांच्या वडिलांना ऑनलाईन पद्धतीने आदिल च्या छोट्या भावाच्या मार्फत देण्यात आली. या अगोदर काही वर्षांपासून कुर्बानीच्या रकमेतून अनेक जणांना मदत केली गेली आहे.
सातारातील माण खटाव तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागात काम करणारे प्रसिद्ध सिने कलाकार सयाजी शिंदे यांना कुर्बानीतील रक्कम गोळा करून देण्यात आली होती.तसेच कोल्हापूर, केरळ, चिपळूण मध्ये आलेल्या पुराच्या वेळी पूरग्रस्तांना मदत केली होती. कोरोना काळात प्लाझ्मा डोनेशनचे आवाहन केले होते.तसेच दरवर्षी कुर्बानीतील काही रक्कम जमा करून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येते.
खुप छान काम करत आहे
स्तुत्य कार्य
Very good