आरएसएस चा शतकोत्सव दसरा मेळावा संपन्न!

Share


प्रतिनिधी : सुरेश बोर्ले

नागपूरच्या तुळशीबागेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शतकोत्सव सोहळा! आज सकाळी दसरा मेळावा निमित्ताने साजरा झाला. स्वातंत्र्य चळवळीत महत्वाची भूमिका ह्या संघाने बजावली होती.अनेक जाती धर्माच्या लोकांनी ह्या चळवळीत भाग घेतला होता. आज सकाळी सरसंघचालक मा.मोहन भागवत ह्यांच्या हस्ते!शस्त्र पूजन करून ह्या मेळाव्याची सुरुवात झाली. मग ध्वज संचलनाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.ह्या संचलनात वाद्य वृंदासहीत २१,००० कार्यकर्त्यांनी भाग घेतला.
संघ म्हटले की शिस्त व
अनुशासन ह्याच प्रतीक आहे.ह्याची प्रचिती संचलन करताना आली.शेवटी तमाम जनतेला मार्गदर्शन करताना,
सर संघ चालक मा.भागवत साहेबांनी स्वातंत्र्यपूर्व भारत, आझाद भारत, प्रगतिशील भारत व त्याचे होणारे जागतिक परिणाम!याचा आढावा त्यांनी घेतला. अमेरिकेसारख्या देशाकडून असहकार्याच्या
भूमिके बद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.तर शेजारील देश तोही आमचाच भाग आहे,त्यामधील माणसे सुद्धा आमचीच आहेत. पण त्या राष्ट्रांकडून होत असलेल्या अमानवी कृत्यानं बद्दल त्यांनी खंत व्यक्त करताना, भारताने त्यांच्या प्रत्येक कृत्यांवर सडेतोड उत्तर दिलेले आहे!असे मत त्यांनी व्यक्त केले.शेवटी भारत देश प्रगत होऊन जगात श्रेष्ठ होइल अशी भावना त्यांनी व्यक्त केली.सदर प्रसंगी माझी राष्ट्रपती
मा.रामनाथ कोविंद हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.तर केंद्रीय मंत्री मा.नीतीन गडकरी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह इतर उपस्थित होते.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *