
मुंबई : मालाड बौ.पं.स.गट.क्र.29 मधील लिबर्टी गार्डन येथे बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 596 व पंचशील महिला मंडळाच्या वतीने वर्षावास सांगता समारंभ पार पडला. हा वर्षावास विश्वशांती बुद्ध विहार लिबर्टी गार्डन येथे सातत्याने गेली 23 वर्ष पंचायत समिती 596 च्या माध्यमातून होत आहे.
ह्या कार्यक्रमात वर्षावास पुर्ण 3 महिने राबविण्यात आला. त्यात वंदनीय, बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे वाचणं व श्रवण करण्यासाठी आलेल्या उपासक यांचे सन्मान करण्यात आले. त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांना नर्सरी ते डिग्री पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना वही ,पेन, कंपास, सन्मान चिन्हे व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. ह्या कार्यक्रमात बौद्धजन पंचायत समिती गट क्रमांक 29 चे विश्वस्त, गट प्रतिनिधी तसेच मालाड विधानसभा अध्यक्ष रिपाइंचे आयु.सुनील गमरे उपस्थित होते.
त्यांच्या सोबत तालुका उपाध्यक्ष विजय माने ही होते.
….ह्या कार्यक्रमात गट प्रतिनिधी सुनिल गमरे यांनी सामाजिक, राजकीय, व धार्मिक विषय या तिन्ही बाबींचा विचार करून उपस्थित समाजाला योग्य मार्गदर्शन केले, तद्नंतर त्यांच्या हस्ते मुलांचे वह्या,पेन, सन्मानचिन्हे व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच वर्षावास ला येणार्या महिलांचे सन्मानचिन्हे देऊन सन्मान करण्यात आले. जाता जाता सुनिल गमरे यांनी रिपाइंच्या वतीने 14 ऑक्टो.2025 रोजी महाबोधी बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या मागणीसाठी जिजामाता उद्यान ते आझाद मैदान येथे मोर्चा काढण्यात येणार आहे त्यात सर्व संघटनांनी सामील व्हा असे आव्हानही केले.
हा संपूर्ण कार्यक्रम पंचायत समिती शाखा क्रमांक 596 चे उपाध्यक्ष सुरेश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव शरद बेटकर यांनी तर सूत्रसंचालन महेश कांबळे यांनी केले.
…….या वेळी व्यासपीठावर अध्यक्ष सुभाष सावंत, महिला अध्यक्षा सौ. स्वाती बेटकर,महिला सचिव सौ. नेहा कांबळे, इतर कार्यकारिणी, सभासद, स्वाती कांबळे, गीता गमरे,भारती कदम, सुजाता जाधव, शोभना कांबळे, मंगेश tompe, भरत कांबळे, सतिश कांबळे, सखाराम कांबळे, अमित कांबळे, योगेश कांबळे, भावेश कांबळे, जितेंद्र जाधव, अमित पवार, मयूर लाखण ,सुमित गमरे,प्रथमेश जाधव इत्यादी होते.
कार्यक्रम शेवटी सर्वांना पंचायत समिती च्या वतीने भोजनदान देण्यात आले.
पुढच्या वाटचाली करता खुप खुप शुभेच्छा
Good work
Good