प्रतिनिधी : वैशाली महाडिक

कांदिवली : चारकोप येथे रयत शिक्षण संस्थेचे ज्ञानवर्धिनी विद्यालय चारकोप ,माजी विद्यार्थी संघटना आम्ही स्वावलंबी प्रतिष्ठान तसेच ग्रंथ तुमच्या दारी मुंबई विभाग आयोजित अभिजात मराठी भाषा गौरव दिन आज दि.७ ऑक्टोबर रोजी संपन्न झाला. कर्मवीर भाऊराव पाटील व सरस्वती यांच्या प्रतिमा पूजनानंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री दादा गावित सर यांनी प्रास्ताविक करून सर्वांचे स्वागत केले.
आम्ही स्वावलंबी प्रतिष्ठान च्या सल्लागार माविनकुर्वे मॅडम यांनी समारंभास शुभेच्छा देताना शाळेच्या विविध कार्यक्रमात माजी विद्यार्थी संघटनेचा सहभाग आवश्यक या सरकारी धोरणाचा उल्लेख करून शाळेस गेली १२ वर्षे माजी विद्यार्थी श्री घनश्याम देटके यांच्या सक्षम नेतृत्वाचा लाभ होत आहे याबद्दल आनंद व्यक्त केला.
आपल्या मुख्य भाषणात श्रीमती सुनीता महाडिक मॅडम यांनी आपली मराठी भाषा विद्यार्थ्यानी जपली व जोपासली पाहिजे व भाषेच्या संवर्धनासाठी झटले पाहिजे असे प्रबोधनपर भाषण केले.
स्थानिक स्कूल कमिटी ज्येष्ठ सदस्य श्री महादेव भिंगार्डे यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करून पाहुण्यांनी सुचवल्या प्रमाणे आजच्या कार्यक्रमांचा अभिप्राय मराठीत जरूर लिहावा असे आवाहन केले.
शाळेचे शिक्षक श्री दत्तात्रय धुमाळ सर व श्री विजय पाटील सर यांनी पाहुण्यांचा परिचय व सूत्रसंचालन केले.
,माजी विद्यार्थी व ग्रंथ तुमच्या दारी यांनी खास आकर्षक सेल्फी स्टँड उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रंथ तुमच्या दारी मुख्य समन्वयक डॉ महेश अभ्यंकर व अपना बाजार चारकोप यांचे आभार मानले.
या दिनाचे महत्त्व म्हणून ८ ते१० वीच्या विद्यार्थ्यांची लेखक व कवी यांची नावे ओळखणे अशी शब्द कोडे स्पर्धा घेतली.त्यासाठी जयेश पांचाळ या माजी विद्यार्थ्यांने विशेष सहाय्य केले.परिसरातील स्वयंसिद्धा महिला मंडळ संस्थापिका अश्विनी फडतरे मॅडम याची विशेष उपस्थिती होती.मुख्याध्यापक व शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी वर्गाने कार्यक्रम यशस्वी केला.
आभार प्रदर्शन व राष्ट्र गीत होऊन कार्यक्रमांची सांगता झाली
Good
Great
खूपच छान!आमच्या पीढीने माय मराठीकडे दुर्लक्ष केल्याची मोठी चूक श्री.घनशाम देटके यांच्यासारखे नव्या पीढीतील कार्यकर्ते सुधारत आहेत, याबद्दल त्यांचे व सर्वच कार्यकर्त्यांचे कौतुक!भविष्यात असे कार्य करणाऱ्या सर्वांना कल्याणमस्तु।