‘लाडकी बहीण’ योजनेत विधवा, परितक्त्या व एकल महिलांसाठी KYC प्रक्रिया सुलभ करा.

Share

प्रतिनिधी : वैशाली महाडिक

मुंबई : सामाजिक कार्यकर्ते ॲड. दिपक सोनावणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री, महिला व बालविकास मंत्री मा. आदिती ताई तटकरे आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांना निवेदन पाठवून ‘लाडकी बहीण’ योजनेत विधवा, परितक्त्या व एकल महिलांसाठी KYC प्रक्रिया सुलभ करण्याची मागणी केली आहे.या महिलांकडे पतीचे अथवा वडिलांचे आधार किंवा इतर आवश्यक कागदपत्रे नसल्यामुळे KYC प्रक्रिया पूर्ण करणे कठीण झाले आहे, आणि परिणामी त्या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.

विशेषतः मूळ गावाशी संबंध तुटलेल्या, माहेरकडून सहाय्य नसलेल्या महिला, नवरा किंवा वडिलांचा मृत्यू होऊन दहा वर्षे झाले असतील अशा महिलांना ही समस्या अधिक गंभीर आहे. त्या आर्थिक, सामाजिक आणि मानसिकदृष्ट्या अनेक अडचणींचा सामना करतात.

ॲड. दीपक सोनावणे यांच्या मागण्या / शिफारसी:
@ पर्यायी ओळख पडताळणी प्रणाली सुरू करणे, जे KYC प्रक्रियेत अडथळा येणाऱ्या एकल महिलांसाठी उपयोगी ठरेल.

@ स्वघोषणा पत्राद्वारे KYC प्रक्रिया पूर्ण करण्याची संधी देणे.

@तालुकास्तरावर एकल महिला सहाय्यता केंद्राची स्थापना, ज्याद्वारे अर्ज प्रक्रिया व KYC पूर्ण करण्यास मदत मिळेल.

@ अशा महिलांची माहिती संकलित करून त्यांचे पुनर्वसन व आर्थिक सक्षमीकरण सुनिश्चित करणे.

ॲड. दीपक सोनावणे म्हणाले, “या उपाययोजनांमुळे राज्यातील महिलांना समानता, न्याय आणि सक्षमीकरण मिळेल, आणि ‘लाडकी बहीण’ योजना सर्व महिलांसाठी वास्तवात परिणामकारक ठरेल.”


Share

3 thoughts on “‘लाडकी बहीण’ योजनेत विधवा, परितक्त्या व एकल महिलांसाठी KYC प्रक्रिया सुलभ करा.

  1. KYC सोप करणे हि खरच गरज आहे कारण काही महिला खुप कमी शिक्षण झाले ले आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *