
प्रतिनिधी : मिलन शहा
मिरा-भाईंदर शहरातील जनतेला दिलेल्या विकासाच्या वचनांची पूर्तता करत मा.ना.श्री. प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक, महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्हा पालकमंत्री आणि स्थानीय आमदार यांच्या संकल्पनेतून आणि विशेष निधीतून साकारण्यात आलेल्या “स्व. गिल्बर्ट जॉन मेंडोन्सा ट्राफिक पार्क”चे आज गुरुवार दिनांक ०९ सप्टेंबर २०२५
रोजी स्व. गिल्बर्ट जॉन मेंडोन्सा यांच्या कुटुंबीयांच्या शुभहस्ते लोकार्पण संपन्न झाले.
मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीत स्थित मिरा रोड पूर्व भागातील आरक्षण क्र. २५६ या जागेवरील ट्राफिक पार्कला “स्वर्गीय गिल्बर्ट जॉन मेंडोन्सा” यांच्या जयंतीनिमित्ताने “स्व. गिल्बर्ट जॉन मेंडोन्सा ट्राफिक पार्क” असे नाव द्यावेत असा प्रस्ताव मंत्री प्रताप सरनाईक यांनी महानगरपालिकेकडे मांडला होता आणि या प्रस्तावावर मिरा-भाईंदर महानगरपालिकेकडून शिक्कमोर्तब करण्यात आले. स्व. गिल्बर्ट जॉन मेंडोन्सा यांनी मिरा-भाईंदर परिसराच्या विकासासाठी अत्यंत मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यांच्या सामाजिक बांधिलकी, सार्वजनिक कार्य आणि शहराच्या उन्नतीसाठी दिलेल्या योगदानाची दखल म्हणून हे नामकरण करण्यात आले असल्याचे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.
“स्व. गिल्बर्ट जॉन मेंडोन्सा ट्राफिक पार्क”चे उद्देश :
“स्व. गिल्बर्ट जॉन मेंडोन्सा ट्राफिक पार्क” चे एकूण क्षेत्रफळ २३६५ चौरस मीटर असून या ट्रॅफिक पार्कद्वारे नागरिकांमध्ये विशेषतः लहान मुलांमध्ये वाहतूक नियमांचे शिक्षण, जनजागृती आणि सुरक्षित वाहतुकीची संस्कृती निर्माण करण्याचा उद्देश आहे. मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या सहकार्याने आणि स्थानिक जनप्रतिनिधींच्या पुढाकाराने हे पार्क उभारण्यात आले आहे. या पार्क मध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी प्ले एरिया तसेच बसण्यासाठी बनविण्यात आलेल्या एरियामध्ये ट्राफिकच्या सांकेतिक खुणा जागोजागी लावण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रकारे लहानमुलांसाठी कमांडो वाॅल, क्लायमिंग वाॅल, स्विमिंग ब्रिज, वेगवेगळे टर्नल देखील उभारण्यात आले आहेत.
याप्रसंगी बोलताना मंत्री सरनाईक म्हणतात कि,
“स्व. गिल्बर्ट जॉन मेंडोन्सा हे मिरा-भाईंदरच्या सर्वसामान्य नागरिकांच्या मनात कायमचे स्थान निर्माण करून गेले. समाजकारण आणि लोकहिताचे कार्य त्यांनी नेहमी प्रामाणिकपणे केले. त्यांच्या नावाने या ट्रॅफिक पार्कचे नामकरण हे त्यांच्या कार्याला योग्य आदरांजली आहे. वाहतूक शिस्त ही सुरक्षित समाजाची पायरी आहे. लहान मुलांना बालपणापासूनच वाहतूक नियमांचे शिक्षण देणे गरजेचे आहे. या ट्रॅफिक पार्कद्वारे हे कार्य प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रयत्न आहे. या पार्कच्या माध्यमातून लहान मुलांमध्ये आणि नागरिकांमध्ये वाहतूक शिस्त, जनजागृती व सुरक्षा याबाबत सकारात्मक संस्कार रुजतील, हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल.”
Rest in peace sir.
Nice
Park?