
प्रतिनिधी : वैशाली महाडिक
कबनूर : काल पुकार संस्थेअंतर्गत संवेदना साथी यांनी रत्नदीप हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कबनूर येथे ‘फटाके नको, पुस्तक हवे’ या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. रत्नदीप हायस्कूल येथे आठवी ‘अ’च्या विद्यार्थ्यांसाठी सदर सत्र आयोजित करण्यात आले.
यावेळी फटाके आणि पुस्तक यांच्यातील फरक स्पष्ट करून फटाक्यांचे दुष्परिणाम आणि पुस्तकांचे महत्त्व साद चाँदकोटी यांनी सांगितले. ‘फटाके नको, पुस्तके हवीत’ या संजय रेंदाळकर लिखित कवितेचे वाचन कोमल माने यांनी केले आणि त्या कवितेचा अर्थ विद्यार्थ्यांसमोर उलगडून सांगितला.
‘पुस्तके’ माणसाच्या जगण्याला कसा अर्थ देतात आणि ‘फटाके’ कसे आयुष्य उध्वस्त करतात, यावर उदाहरणांसह दामोदर कोळी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि पुस्तक वाचनाचे आवाहन केले. यावेळी विद्यार्थ्यांना ‘साधना’ दिवाळी अंक वाचण्यासाठी देण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना संदेश देण्यात आला की, “प्रकाश करायचा असेल तर पुस्तक वाचून मनातून प्रकाशमय होण्याचा प्रयत्न करा, कारण फटाक्यांचा प्रकाश हा तात्पुरता असतो; पण पुस्तकांनी मिळालेला प्रकाश आयुष्य उजळून टाकतो.”
या कार्यक्रमाला रत्नदीप हायस्कूलचे मुख्याध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, संवेदना साथी दामोदर कोळी, साद चाँदकोटी, कोमल माने आणि विद्यार्थी मोठ्या उत्साहाने उपस्थित होते.
Good
Khup chhan
Eco friendly policy
Great initiative