म.वी.आघाडी नेते घेणार निवडणूक आयोगाची भेट..

Share

प्रतिनिधी : सुरेश बोर्ले

मुंबई : इव्हीएम मशीनचा घोळ,बनावट मतदान,मृत व्यक्ती मतदान,केंद्र ताब्यात घेणे असे अनेक अवैध्य प्रकार मतदानाच्या वेळेस होत असतात असे प्रकार रोखण्यासाठी,आता महा विकास आघाडी मैदानात उतरली आहे. त्यामध्येशिवसेना,मनसे,
राष्ट्रवादी व ईतर अनेक घटक पक्ष एकत्र येताना दिसत आहेत.त्यासाठी हे मान्यवर नेते
निवडणूक आयोग मुख्यांची भेट घेणार आहेत.महत्वाच मुद्दा सध्या गाजतोय तो म्हणजे निवडणूक यादीत होणारे घोटाळे.
काँग्रेस नेते राहुल गांधी ह्यांनी यादी घोळ घोटाळा चव्हाट्यावर आणल्यामुळे!ह्या गोष्टीला महत्व प्राप्त झाले.असे अनेक घोटाळे येणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्रात होऊ नयेत म्हणून ही आघाडी प्रयत्नशील असेल.कारण जर खरोखरच हे घोटाळे होत असतील तर? त्यांनाही नुकसान होणार!ह्यावर खबरदारी म्हणून मुख्य आयोग अधिकारी व त्यांच्या इतर सहकार्यान बरोबर ही महत्वाची चर्चा होणार आहे. मात्र भाजपाने ह्या कृती बद्दल विरोध दर्शवला आहे.


Share

One thought on “म.वी.आघाडी नेते घेणार निवडणूक आयोगाची भेट..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *