
प्रतिनिधी : मिलन शहा
मुंबई–अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडीच्या दरम्यान, पालकमंत्री गणेश नाईक यांच्या ताफ्याने Wrong Side ने प्रवास केल्याचा प्रकार समोर आला आहे.
या घटनेमुळे जनतेमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागरिक म्हणतात —
“आम्ही जर Wrong Side ने गेलो तर पोलिस दंड करतात. मग मंत्री आणि त्यांचा ताफा काय विशेष आहे का?”
पालकमंत्री स्वतःसाठी रस्ता मोकळा करून घेतात, पण सामान्य जनतेला तासन्तास ट्रॅफिकमध्ये अडकवून ठेवतात, हे दुहेरी धोरण असह्य आहे.
RTO आणि वाहतूक पोलिसांनी या ताफ्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी जनतेची मागणी आहे.
लोकशाहीत मंत्री जनतेचे सेवक असतात, पण आज परिस्थिती उलट दिसतेय — जनता वेठीस धरली जाते आणि सत्ताधारी मोकळ्या रस्त्यावरून निघून जातात!
आपणच निवडुन दिलेले देव आहेत मग आता ओरडा ओरडी करुन काय फायदा गुपचुप सर्व सहन करायचे
Bilkul sahi bat hai
आता भोगा कर्माचे फळ