
प्रतिनिधी :उत्कर्ष बोर्ले
मुंबई : जोगेश्वरी पूर्व येथील श्री समर्थ शाळा आणि श्रीमती लक्ष्मीबाई वळंजू प्राथमिक शाळा अशा एकूण १५० विद्यार्थ्यांना दिनांक १६ ऑक्टोबर २०२५ रोजी दिवाळी निमित्त फराळ वाटप आणि प्रत्येकी दोन पणत्या देण्यात आल्या.या शाळेत येणारी बहुतांश मुले ही आरे आदिवासी शाळेतील असून अभ्यासात आणि खेळात हुशार आहेत.१७ ऑक्टोबर पासून दिवाळी सुट्टी असल्याने विद्यार्थ्यांनी एक दिवस आधीच शाळा साफसफाई करून छान छान रांगोळ्या काढल्या.यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ एम डी वळंजू, कार्यकारिणी सभासद गणेश हिरवे, शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत वाडेकर, प्रायमरीच्या मुख्याध्यापिका सुनीता निंबाळकर तसेच मैत्र संस्थेचे सभासद सुनील सरदेसाई, देवेंद्र तारी, अरविंद नाईक, हर्षा परब, हरीश परब, मिताली रेडकर, श्रीराम कानडे, सुरेश चाळके,अनिल फणसे आदी कार्यकर्ते वेळात वेळ काढून उपस्थित होते. मुलांनी देखील मिठाई मिळाल्याने आनंद व्यक्त केला.
Great
छान