मालवणी आंबोजवाडी येथील झोपडी धारक पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत..

Share

प्रतिनिधी : वैशाली महाडिक

मुंबई: सुमारे 3 वर्षा पुर्वी शासकीय नियम धाब्यावर बसवत मालाड मालवणी येथील आंबोजवाडी येथील 250 झोपडपट्टी धारकांना भर पावसात घराबाहेर काढले व तीन टप्प्यात त्यांची घरे जी पावसात तोडायची नसतात. तरी तेव्हाच्या प्रशासकीय अधिकारी यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून तेथील गरीब जनतेला त्यांच्या घरावर बुलडोझर फिरवला. व त्या 250 घरांवर बेघर होण्याची वेळ आली. ह्या साठी रिपाइंचे मालाड विधानसभा अध्यक्ष श्री. सुनील गमरे यांनी त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालये येथे मोर्चा काढून निषेध नोंदवीत त्या झोपडपट्टी धारकांना लवकरच पुनर्वसनाच्या गर्तेत त्यांस घरे मिळाली पाहिजे या साठी गेली दोन वर्षे निवेदन देत आहे व संघर्ष करत आहे. आज पून्हा श्री. सुनील गमरे यांनी श्री. सौरभ कटारिया जिल्हाधिकारी मुंबई उपनगर बांद्रा यांची भेट घेऊन त्यांस ही पून्हा त्या 250 झोपडपट्टी धारक यांचे लवकरच पुनर्वसन करून त्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी करण्यात आली. तेव्हा जिल्हाधिकारी श्री. सौरभ कटारिया यांनी निवेदन वाचून योग्य ते शासनाच्या नियमानुसार त्यांच पुनर्वसन करण्यात येईल अस आश्वासन दिले. यावेळी श्री. सुनिल गमरे याच्यासह आशाताई खैरनार शाखा अध्यक्षा रिपाइं, रॉयल संयोग सेवा सोसायटी, नशीब हून निशा, फातिमा शेख गुलाब तारा, साजिद मुजावर तिसरा फोन निशा,आदि मान्यवर उपस्थित होते.


Share

2 thoughts on “मालवणी आंबोजवाडी येथील झोपडी धारक पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *