पूरग्रस्त गावांमध्ये भाकर फाउंडेशनच्या वतीने मदतकार्य.

Share

प्रतिनिधी : सुरेश बोर्ले

विशेष : परंडा तालुका वागेगव्हाण, देवगाव, वडनेर, आवार पिंपरी, ढग पिंपरी, लव्हा, कातराबाद, लोहार आणि असु या नऊ गावांमध्ये भाकर फाउंडेशनच्या टीमने दिवाळीपूर्व मदतकार्य राबवले.

दिवाळीच्या आनंदाच्या काळात, पूरग्रस्त कुटुंबांच्या जीवनात थोडासा प्रकाश आणि आशेचा किरण आणण्यासाठी अन्नधान्य, महिलांसाठी नवीन साड्या, युवती व बालकांसाठी नवीन कपडे, ब्लँकेट, टॉवेल, घरांवर टाकण्यासाठी प्लास्टिक ताडपत्री व इतर आवश्यक वस्तू वाटप करण्यात आल्या.

या मदत कार्यात विशेष प्राधान्य एकल महिला, शेतमजूर, अपंग व्यक्ती, स्थलांतरित ऊसतोड कामगार, स्थलांतरित कातकरी आदिवासी कामगार आणि बालकांना दिले गेले. स्थानिक पातळीवर कोरो इंडिया एकल महिला संघटनेच्या अनिताताई नवले आणि विशालभाऊ नवले यांनी महत्वाचे सहकार्य केले.

भाकर फाउंडेशनचे संस्थापक ॲड. दिपक सोनावणे, कुणाल शिंदे (मराठी बोलू यूट्यूब चॅनल), वस्ती समन्वयक आकाश शिरसागर, प्रशांत चव्हाण, दिपक भालेराव आणि मानसी आचरेकर यांनी प्रत्यक्ष गावांमध्ये जाऊन मदत वितरण केले.

भाकर फाउंडेशनच्या वतीने सर्व देणगीदार, स्वयंसेवक आणि सहकार्य करणाऱ्या व्यक्तींप्रती मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. आपली मदत योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाल्याबद्दल आम्हाला आनंद आहे.

खरी दिवाळी तीच — जी इतरांच्या आयुष्यात प्रकाश आणि आशेचा किरण आणते!


Share

2 thoughts on “पूरग्रस्त गावांमध्ये भाकर फाउंडेशनच्या वतीने मदतकार्य.

  1. या सर्व फाउंडेशनचे खरच मना पासुन आभार व्यक्त करतो या लोकना गरिबाचे हाल पाहवत नाही हे समाजा साठि रात्र दिवस काम करतात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *