
प्रतिनिधी : कृष्णा वागगमारे
मुंबई: शिवसेनेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक व विद्या भूषण शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गजानन संतुराम ठाकरे (वय ८३) यांचे आज दिनांक १८ रोजी, रात्री साडेनऊ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने दहिसर परिसरात शोककळा पसरली आहे.
गजानन ठाकरे हे समाजकारण, शिक्षण क्षेत्र आणि स्थानिक विकासकामांमध्ये दीर्घकाळ कार्यरत होते. विद्या भूषण शिक्षण संस्था स्थापन करून त्यांनी असंख्य विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी सर्वसामान्य जनतेचा विश्वास संपादन केला होता.
त्यांचे पार्थिव (रविवार) सकाळी अकरा ते दुपारी एक वाजेपर्यंत विद्या भूषण हायस्कूलच्या तळमजल्यावर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर दुपारी एक वाजता विद्या भूषण हायस्कूल, शिवाई संकुल, शिव वल्लभ क्रॉस रोड, दहिसर (पूर्व) येथून अंत्ययात्रा निघाली.
गजानन ठाकरे यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व नागरिकांनी आणि संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांनी अंत्यदर्शनासाठी उपस्थित होते तसेच सर्व पक्षीय कार्यकर्ते आणि नेते ही अंत्य यात्रेत सहभागी झाले होते.
त्यांच्या निधनामुळे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.
Rip
Rip