
प्रतिनिधी :उत्कर्ष बोर्ले
मुंबई : जॉय ऑफ गिव्हिंग या सामाजिक संस्थेच्या वतीने रस्त्यावर राहणाऱ्या कामगारांच्या मुलांसाठी दिवाळी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. हे विद्यार्थी जोगेश्वरी (पूर्व) सुभाषनगर आणि गोरेगाव (पूर्व) फिल्मसिटी परिसरातील डोअर स्टेप स्कूलच्या बसमध्ये शिक्षण घेतात. या दोन्ही केंद्रांवर सध्या सुमारे १०० मुले शिक्षण घेत असून, त्यांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने त्यांना किराणा किट व दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश हिरवे गुरुजी यांनी सांगितले की, जॉय ऑफ गिव्हिंग संस्था गेल्या काही वर्षांपासून वृद्ध, रोजंदारीवर काम करणारे कामगार, आदिवासी आश्रमशाळा, वृद्धाश्रमातील रहिवासी आणि वंचित घटकांना किराणा किट तसेच शैक्षणिक साहित्याचे वाटप करत असून, संस्थेचे सामाजिक कार्य वर्षभर अखंडपणे सुरू असते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जॉय संस्थेचे सभासद आणि समाजातील देणगीदार स्वतः पदरमोड करून योगदान देतात, असे हिरवे गुरुजींनी सांगून सर्वांचे कौतुक केले. लॉकडाऊन काळातही संस्थेने उल्लेखनीय काम केले होते.
नुकतेच अंबरनाथ येथे “आदर्श रायगड वृत्तपत्र” च्या वर्धापन दिनानिमित्त जॉय संस्थेला “आदर्श संस्था पुरस्कार” प्रदान करण्यात आला. त्यानिमित्ताने असुंता डिसोजा आणि चंद्रशेखर सावंत यांना पुरस्कार सुपूर्द करण्यात आले.
या उपक्रमासाठी असुंता डिसोजा, शीला येरागी, छाया राणे, मीना भुतकर, चंद्रशेखर सावंत, सुनील चव्हाण, विजय शानभाग, भूषण मुळ्ये, अविनाश करगुटकर आदी कार्यकर्त्यांनी वेळात वेळ काढून सहभाग घेतला.
शंभर विद्यार्थ्यांची दिवाळी गोड झाल्याने जॉय संस्थेचे सदस्य, देणगीदार आणि उपस्थित सर्वांनीच आनंद व समाधान व्यक्त केले. संस्थेच्या वतीने सर्व सहकार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
अतिशय सुंदर उपक्रम राबविण्यात आला, आपल्या सहकार्यामुळे या चिमुकल्यांची यंदाची दिवाळी सुख, समृद्धीची, भरभराटीची जाईल.यासाठी प्रेक्षक आपले कायम ऋणी राहतील…
धन्यवाद!…
स्तुत्यउपक्रम
Nice