उबाठा शिवसेनेतर्फे ‘सांज दीपावली’चा जल्लोष अंधेरीत.

Share

प्रतिनिधी :उत्कर्ष बोर्ले

मुंबई: शिवसेना नेते अ‍ॅड. अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शाखा क्र. ६५/६६ तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘सांज दीपावली’ हा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम रविवारी (दि. १९ ऑक्टोबर) संध्याकाळी अंधेरी (प.) येथील हेलन क्रीडांगणावर पार पडला.

कार्यक्रमाचे आयोजन उपविभाग प्रमुख प्रसाद आयरे, उपविभाग संघटक सौ. संजीवनी ताई घोसाळकर, शाखाप्रमुख दयानंद कडी, उदय महाले, रेवती सुर्वे आणि मनाली ताई पाटील यांच्या पुढाकाराने करण्यात आले. लोकधारा आणि Gen Z शैलीत सादर करण्यात आलेल्या विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी प्रेक्षकांची मने जिंकली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्राहक संरक्षण कक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य मनोज जाधव यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड. अनिल परब, माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, आमदार हारून खान, उपनेते अमोल (भैया) कीर्तिकर, विभाग संघटक अनिता बागवे, विधानसभा सहसंघटक सौ. ज्योत्स्ना दिघे, विधानसभा संघटक संजय मानाजी कदम, समन्वयक सुनील खाबीया यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी युवा सेनेचे अ‍ॅड. प्रसाद मोगरे, दीपेश तावडे, विनय कशाळकर, सुजित हलकरणी आणि सर्व शिवसैनिकांनी विशेष परिश्रम घेतले.


Share

One thought on “उबाठा शिवसेनेतर्फे ‘सांज दीपावली’चा जल्लोष अंधेरीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *