भाजपच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड यांचा उद्धव सेनेत प्रवेश.

Share

प्रतिनिधी : मिलन शहा

नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या भाजपच्या माजी नगरसेविका सौ. संगीता गायकवाड आणि हेमंत गायकवाड यांनी आपल्या सहकाऱ्यांसह आज मातोश्री येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला.

या प्रसंगी पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांनी त्यांचे पक्षात मनपूर्वक स्वागत केले. प्रवेश सोहळ्यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, उपनेते दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी तसेच इतर शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रवेशामुळे नाशिकमधील शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक बळकट होणार असल्याचे मत स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.


Share

4 thoughts on “भाजपच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड यांचा उद्धव सेनेत प्रवेश.

  1. शेवट निकाल काय लागतो हा बघन फार गरजेचे आहे टिकिट साठी ये जा होत राहणार

  2. पहा सामान्य मतदार जनतेच्या जीवावर निवडून येऊन हे (पुढारी) लोकप्रतिनिधी कसे मजा मारतात ते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *