प्रतिनिधी | एसएम समाचार-सुरेश बोर्ले
महिला नेतृत्वाच्या दिशेने जपानचं मोठं पाऊल!
विश्व् :जपानमध्ये इतिहास घडला आहे! देशाच्या संसदीय प्रक्रियेनंतर साने ताकाई (Sanae Takaichi) यांची अधिकृतरीत्या जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली आहे. दोन्ही सदनांतील मतदानात ताकाई यांनी बहुमत मिळवून विजय मिळवला आणि त्या जपानच्या राजकीय इतिहासात नव्या अध्यायाची सुरुवात करत आहेत.
साने ताकाई या लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी (LDP) या सत्ताधारी पक्षाच्या नेत्या असून, त्यांनी अनेक वर्षे मंत्रीपदाची जबाबदारी पार पाडली आहे. त्यांच्या निवडीमुळे जपानच्या दीर्घकाळ पुरुषप्रधान राजकारणात महिलांचा सहभाग वाढवण्याच्या दिशेने एक ऐतिहासिक टप्पा गाठला गेला आहे.
ताकाई यांनी आपल्या भाषणात म्हटले —
“जपानमध्ये महिलांना समान संधी मिळाव्यात आणि समाजातील प्रत्येक क्षेत्रात त्यांचा सहभाग वाढावा, यासाठी मी प्रयत्नशील राहीन.”
त्यांच्या या निवडीचे जगभरातून स्वागत होत आहे. भारत, बांगलादेश आणि आता जपान — या तिन्ही देशांनी महिलांना सर्वोच्च राजकीय नेतृत्व दिल्याने आशियातील महिला नेतृत्व अधिक सक्षम होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
साने ताकाई यांना समोर महागाई, आर्थिक मंदी, आणि कमी होत चाललेली लोकसंख्या या मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. मात्र त्यांच्या दृढ नेतृत्वाने आणि ठाम निर्णयक्षमतेने जपान नक्कीच नवा मार्ग शोधेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आपल्या भारत देशात देखील महिलांना अशाप्रकारे संधी मिळायला हवी..
Great world is changing very soon world wide scenario will be change