अल्पवयीनचिमुकल्याचा आकसा समुद्रात बुडून मृत्यू..

Share

प्रतिनिधी :एसएमसमाचार -उत्कर्ष बोर्ले

मुंबई : मालाड पश्चिमेतील येथील पटेलवाडी, आकसा समुद्र किनाऱ्यावर आयएनएस हमला या दिशेला असलेल्या समुद्रकिनारी सोमवारी (दि. २१ ऑक्टोबर) संध्याकाळी  दुर्दैवी घटनेत मयांक ढोल्या (वय १३ वर्षे) हा मुलगा समुद्रात पोहत असताना बुडून मृत झाला.

माहितीनुसार, मयांक आणि त्याचे मित्र रोज या ठिकाणी पोहायला जात असत. संबंधित ठिकाणी पाण्यात उतरण्यास सक्त मनाई असूनही ही मुलं दररोज तेथे पोहत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. जीवरक्षक जवळ आल्यावर ही मुलं जे जे नरसिंग होम जवळील झाडीत लपतात आणि जीवरक्षक निघून गेल्यावर पुन्हा पाण्यात उतरतात, अशीही माहिती समोर आली आहे.

संध्याकाळी सुमारे ५ वाजताच्या सुमारास मयांक बुडाल्याचे समजताच स्थानिकांनी तातडीने पोलीस व अग्निशमन दलाला पाचारण केले. शोधमोहीम अंधार पडल्याने साडेसात वाजता थांबवण्यात आली. रात्री सुमारे १० वाजता मयांकचा मृतदेह सापडला. शवविच्छेदना साठी पाठवण्यात आलं आहे.

घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पोलीस आणि अग्निशमन दल  पुढील तपास करीत असल्याची माहिती मिळाली.


Share

4 thoughts on “अल्पवयीनचिमुकल्याचा आकसा समुद्रात बुडून मृत्यू..

  1. अक्सा समुद्र तसा अत्यंत धोकादायक असून गेले काही वर्ष याठिकाणी जीवनरक्षक तैनात आहे.संबंधित प्रशासनाकडून माहितीचा रितसर फलक लावला आहे.तर जीवनरक्षक अनेकदा पर्यटकांना हंबरडा फोडून सांगतात.मात्र, पर्यटक किंवा खासकरून लहान मुलं कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यातून समुद्राजवळ जाणारा रस्ता शोधून काढून कसेबसे पोहायला निसटतात त्यामुळे अशा घटना घडतात. याचा बोध घेऊन स्थानिक नागरिकांनी व लहान मुलांच्या पालकांनी मुलांकडे जरूर लक्ष द्यावे…

  2. आतची मुल आई वडिलाना न घाबरत समुद्र ठिकानी जातात अक्सा समुद्र तसा अत्यंत धोकादायक असून गेले काही वर्ष याठिकाणी जीवनरक्षक तैनात आहे.संबंधित प्रशासनाकडून माहितीचा रितसर फलक लावला आहे.पण हि मुल कोणता ही विचार न करता सरस समुद्रात खोलवर पोहायला जातात आणि अशा दुर्घटना घडतात फार वाईट परिस्थिती आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *