
प्रतिनिधी : एसएमसमाचार -वैशाली महाडिक
मुंबई : मराठी साहित्याचे आगळे वेगळे पण जपणारी दिवाळी अंक वाचन योजना आम्ही स्वावलंबी प्रतिष्ठान व ग्रंथ तुमच्या दारी मुंबई विभागातर्फे गेले दहा वर्ष वाचकांच्या सहकार्याने कार्यान्वित आहे या उपक्रमाचा प्रारंभ बलिप्रतिपदा दिवाळी पाडवा च्या निम्मिताने बुधवार २२ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता सुप्रसिद्ध लेखक ,साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार विजेते श्री एकनाथ आव्हाड सर यांच्या शुभ हस्ते दिमाखदार सोहळ्यात पार पडला
उदघाटन प्रसंगी केलेल्या भाषणात ते म्हणाले, की दिवाळी अंक वाचन हे आपल्याला नवविचारांची दृष्टी देते, आनंद देते. दिवाळी अंकांचे वाचन संस्कृती घडविणारे असते. या करिता मराठी साहित्यातील या दिवाळी अंक परंपरेचे जतन आपण केले पाहिजे
प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही दिवाळी अंक योजना जाहीर केली असता सभासदत्व घेण्यास परिसरातील वाचन प्रेमी मंडळींनी उत्साह दाखवला.
या वेळी सुविद्या प्रसारक संघ, म. ह. चोगले विद्यालय गोराई चे मुख्याद्यापक सचिन गवळी सर सुद्धा उपस्थित होते सर्व दिवाळी अंक परिणीता माविनकुर्वे मॅडम यांच्या घरीच उपलब्ध आहेत त्यांच्या प्रेरणे मुळे ही योजना चारकोप केंद्रात कार्यान्वित आहे.
या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील नामवंत मंडळी उपस्थित होती.
प्रास्ताविक मध्ये आम्ही स्वावलंबी प्रतिष्ठान माजी विद्यार्थी संघटना याचा गेल्या १५ वर्षाचा प्रवास घनश्याम देटके यांनी सांगितला.
रयत शिक्षण संस्थेचे ज्ञानवर्धिनी विद्यालय चारकोप शाळेच्या निसर्ग रम्य प्रांगणात हा सोहळा पार पडला.
शाळेचा माजी विद्याथी संघ ,आम्ही स्वावलंबी प्रतिष्ठान नावाने अशा प्रकारचे काम अविरत पणे करीत असतो या बद्दल दिवाळी अंकाचे सभासद झालेल्या सर्व वाचक मंडळींनी कौतुक केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नम्रता भोसले मॅडम यांनी अतिशय मार्मिक शब्दात केले
आभार प्रदर्शन मुख्याध्यपिका उर्मिला निंबाळकर मॅडम यांनी केले
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वैष्णवी पांचाळ ,जयेश पांचाळ ,नारायण पवार ,संदीप जोशी.मधुकर माने शाळेचे शिपाई भोसले मामा ,बाईत मॅडम यांनी सुद्धा मोलाचे योगदान दिले
खालील मान्यवर उपस्थित होते
महादेव भिंगार्डे ,अशोक चव्हाण ,मदन चव्हाण,उमाकांत जगताप ,मिलिंद शिर्के ,अश्विनी फडतरे मॅडम ,विविध शाळेचे शिक्षक वर्ग सुद्धा उपस्थित होते.
Good
दिवाळी अंक काढून त्याचे जतन करणे ही एक सुसंस्कृत परंपरा म्हणावी लागेल.
मराठी संस्कृतीचा भाग
Good